Categories: Previos News

शंभर वेळा सांगितले भाजपमध्ये जाणार नाही, तरीही… : सचिन पायलट

नवी दिल्ली : 

ऐन कोरोनाच्या काळात राजस्थान मध्ये राजकीय भूकंप झाला आणि सर्वत्र राजकीय चर्चांना उत आला. या राजकीय चर्चेत यामध्ये सर्वात पुढे होते ते राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट. ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगू लागल्या. त्यातच त्यांनी दिल्लीला जाऊन भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्याची बातमी आली आणि राजस्थानमध्ये अघोषित राजकीय आणीबाणी जाहीर झाली. यानंतर काँग्रेसनेही थेट उपमुख्यमंत्री पदावरून पायलट यांना दूर करून त्यांचे प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले. यानंतर मात्र सचिन पायलट आता कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जातील असे आडाखे बांधले जाऊ लागले. मात्र इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सचिन पायलट यांनी मी शंभर वेळा सांगितले की मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही. असे म्हणून उठणाऱ्या सर्व प्रश्नांना तिलांजली दिली आहे. गेल्या पाच वर्षात मी भाजपाविरूद्ध लांब लढाई लढली आहे. राजस्थान कॉंग्रेसचा एक भाग होताना मी भाजपविरुध्द लढा दिला होता आणि राजस्थानात कॉंग्रेस एकत्र केली आहे. जे लोक मी भाजपमध्ये जातील असे म्हणत आहेत ते माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.  चिथावणी देणे व हे पद मागे घेतल्यानंतरही मी पक्षाविरूद्ध एकही शब्द बोललो नाही. आम्ही भविष्यासाठी आपली रणनीती ठरवणार आहोत असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago