Categories: Previos News

हवेलीतील गावांमध्ये ‛पावसाची’ दीड तास बॅटिंग

थेऊर : सहकारनामा ऑनलाईन

जवळपास एक महिना दडी मारल्यानंतर आज सायंकाळी पूर्व हवेलीतील गावामध्ये पावसाने तुफान बॅटींग केली त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. उकाड्याने बेहाल झालेल्या नागरिकांना या पावसाने आल्हाददायक वातावरण निर्माण केले. 

निसर्ग वादळाच्या दरम्यान पुणे व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला परंतु त्यानंतर या भागात चांगला पाऊस पडलाच नाही. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता वाढली परिणामी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. प्रत्येक जण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आकाशात काळेभोर ढग जमा होऊन हवेत बाष्पाचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास जोरदार विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस पडला. या पावसाने जागोजागी पाणी साचले आहे. या पावसामुळे सर्वसामान्य तर आनंदी झाला परंतु याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा झाला आहे. पूर्व भागातील बहुतेक सर्वच गावामध्ये पाऊस पडला आहे. 

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago