कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने व स्थानिक संस्थांनी पत्रकारांना सर्वोतपरी मदत करावी : ऑल इंडिया जर्नालिस्ट अससोसिएशन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

राज्यात अनेक  करोनाचे  हॉटस्पॉट तयार होत असून येथील प्रत्येक घडामोडीचे अपडेट्स लोकांपर्यत  पोहचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या विविध माध्यमांमधील पत्रकार कॅमेरामन आणि फोटोग्राफेरलाही  करोना साथीने गाठले आहे. पोलीस,डॉक्टर्स,नर्सेस यांच्या बरोबर आता पत्रकार कॉरोनच्या टप्प्यात आले आहेत. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या  तपासणी मोहिमेनंतर मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कुठल्या हि परिस्तिथीत पत्रकारांना मुक्त संचार करावा लागतो. ‘कोरोना’पार्श्वभूमीवर शासनाने पत्रकारांना सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष अशोकजी वानखेडे यांनी केली आहे. पत्रकार फोटोग्राफर जीवधोक्यात घालून पोलीस आणि डॉक्टरांनबरोबर काम करत आहे , जीवाला बरावाईट झाले तर शासनाने त्याच्या कुटुंबियाला एक कोटी ची मदत जाहीर करावी अशी मागणी 

 ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे यांनी  केली आहे. 

महाराष्ट्रामधील सर्व पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी, स्यानिटायजर्स, पी.पी.ई.किट व मास्कचे वाटप, विमा स्वरक्षण तसेच पत्रकारांना आवश्यक अन्न धान्याचेही वाटप होणे गरजेचे आहे. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. शासनाकडून पत्रकारांच्या संदर्भात गंभीर होण्याची गरज आहे अशी मागणी  ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन ने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पुणे विभागीय आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त तसेच महापौर पुणे ह्यांना  केली आहे.