Categories: Previos News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजाराम तांबे झाले आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

गुऱ्हाळ मालक व ऊस वाहतूकदार यांच्याकडून ऊस दराबाबत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीबाबत आज दि. १९/०६/२०२० रोजी शेतकरी कृती समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी व गुऱ्हाळ मालक यांच्यामध्ये केडगाव येथे चर्चात्मक बैठक पार पडली. सदर बैठकीत शेतकरी कृती समितीच्या वतीने मा.राजाभाऊ तांबे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. मा.राजाभाऊ तांबे यांनी मांडलेल्या मुद्य्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने पाठिंबा दर्शविला आहे. सदर बैठकीतील महत्वाचे मुद्दे:-

1. कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व गुऱ्हाळ मालकांना निवेदन पत्र देणे, त्याद्वारे गुऱ्हाळ मालकांनी २५००/- रुपये पेक्षा कमी दरात ऊस खरेदी करू नये, ही अट समितीने घातली आहे.

2. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने एक आठवड्याच्या आत सर्व गुऱ्हाळ मालकांची एक बैठक बोलावणे.

3. मा.राजाभाऊ तांबे यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की , शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ मालकांना रु.२५००/- पेक्षा कमी दरात ऊस विकू नये.

4. लॉकडाऊन काळात गूळ ३५/-रु किलो असताना उसाला २९००/- रु प्रति टन भाव मिळत होता परंतु सध्या गुळाचा भाव ३६/- रु किलो असताना उसाला फक्त १९०० ते २००० रुपये एवढा अल्प भाव मिळत आहे. त्यामुळे योग्य दरात भाव दिला जात नाही, असा आरोप मा. राजाभाऊ तांबे यांनी केला आहे.

5. गुऱ्हाळ मालकांचे देखील नुकसान होता कामा नये, त्यांना देखील नफा मिळाला पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच राजाभाऊ तांबे यांनी गुऱ्हाळ मालक व शेतकरी यामध्ये बाजार समितीने मध्यस्थीने तोडगा काढावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे.

6. सदर मुद्द्यांबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा मा.राजाभाऊ तांबे यांनी दिला असून, अशा आंदोलनास कृषी उत्पन्न समिती पाठिंबा देईल, असे मत समिती पदाधिकाऱ्यांनी मांडले.

सदर बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पाचपुते साहेब, संचालक दिलीपजी हंडाळ, उपसभापती रामभाऊ चौधरी, बोरकर साहेब तसेच शेतकरी कृती समितीच्या वतीने मा.राजाभाऊ तांबे याच्यासोबत मा.राजाभाऊ कदम, मा.शांताराम बांदल, मा.सचिन शिंदे, मा.मंगेश फडके, मा.संतोष सूळ मा.राजू पांढरे, तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

26 मि. ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

21 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

23 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

1 दिवस ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago