केडगाव, यवत, भरतगाव, चौफुला, पाटस अशा पाच गावांपैकी या गावातील ‛तीन’ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मागील महिन्यापर्यंत कुठेतरी एखाद्या गावात आढळणारे पॉझिटिव्ह रुग्ण आता प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. केडगाव, यवत, भरतगाव, चौफुला, पाटस येथेही आता कोरोनाचे रुग्ण सापडत असून काल या पाच गावांतील 40 जणांची कोरोना टेस्ट केल्यानंतर भरतगाव येथील पुन्हा तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे आणि यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली. कोरोनाने फैलाव करताना आता शहरासह आता ग्रामीण भागालाही टार्गेट केले आल्याने येथील नागरिकांच्या चिंता वाढत चालल्या आहेत.