Categories: Previos News

‛राजगृह’ हल्ला प्रकरण : दौंड चर्मकार समाजाच्या वतीने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

ज्या राजगृहात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहलं. त्या राजगृहाची तोडफोड काही माथेफिरूंकडून करण्यात आलेली आहे. त्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट तयार झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव महापुरुष आहेत कि त्यांनी फक्त पुस्तकांसाठी घर बांधलेले आहे. ते घर म्हणजेच राजगृह. भारत देश ज्या संविधानाच्या अंमलबजावणीवर चालतो त्या संविधानाचा मसुदा डॉ. बाबासाहेबांनी याच राजगृहात बनविला होता. डाॅ. बाबासाहेबांच्या “राजगृहाची” तोडफोड करणार्‍या सडक्या बुध्दीच्या माथेफीरुंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व ह्या माथेफिरूंना तात्काळ अटक करण्यात यावी म्हणून या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दौंड येथील चर्मकार समाजाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले व चर्मकार समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मजगर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे, सोमनाथ सोनवणे, संजू सोनवणे, अजय ओरपे,निलेश मजगर उपस्थित होते. संत रोहिदास महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मजगर म्हणाले की गैरसामाजिक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सरकारने कडक कारवाई करावी आणि समाजातून असल्या संकुचित विचार करणाऱ्या प्रवृत्तीना बाहेर काढावे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago