सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेल संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी ससेहोलपट आता थांबण्याचे चिन्ह दिसत आहे. बुधवारी याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढत जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागात नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कुठलीही अट आता ठेवली नसून त्यामुळे आता  पास किंवा ओळख पत्र ठेवण्याची गरज नसल्याचे समजत आहे. मागील दिवसात अनेक गरजेच्या असणाऱ्या वस्तूंची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र यात पेट्रोल आणि डिझेलचा समावेश नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर 5 मे रोजी  खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष यांची बैठक झाली होती या बैठकीमध्ये पंपावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही विशेष वाहन वगळता  सर्वसामान्यांना पेट्रोल देण्याचे ठरले होते मात्र त्याच रात्री पुन्हा यात बदल होऊन सामान्य नागरिकांना इंधन न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामुळे वाहन चालकांचा हिरमोड झाला होता. यानंतर पुन्हा बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नवीन परिपत्रक काढत जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व ठिकाणच्या पेट्रोल पंप चालकांनी सर्वसामान्यांना पास किंवा ओळखपत्राची मागणी न करता इंधन द्यावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पंप शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सुरू राहनार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.