Categories: Previos News

तर राज्य आर्थिक संकटात येईल : शरद पवार यांचे पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना पत्र



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

संपूर्ण जगामध्ये करोनाविषाणूने थैमान घातले आहे. याचा भटका भारतालाही बसला असून यात महाराष्ट्राही वेठीस धरला गेला आहे.लॉकडाउनमुळे राज्यातील उद्योग, धंदे ठप्प झाले असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असल्याने आता राज्यासमोर करोनासोबत आर्थिक संकटही उभं ठाकलं आहे. आणि याच बाबींचा विचार करून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांना पत्र लिहून येणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल इशारा दिला आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीबदल त्यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे. यात त्यांनी या वर्षी  राज्याला तीन लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा महसुल येईल असा  अंदाज होता मात्र अचानक आलेल्या या महाभयंकर कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्याला प्रचंड फटका बसला असून त्यामुळे एक लाख चाळीस हजार कोटींची तूट निर्माण होण्याचा अंदाज पवारांनी पत्रामध्ये केला आहे. 

यात पवारांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले असून त्यातील  काही मुद्दे पुढील प्रमाणे आहेत – लॉकडाऊनमुळे राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे लगेच राज्यात आर्थिक स्थैर्य येईल असे दिसत नाही. राज्याचा महसूल हा नेहमीच्या अपेक्षेपेक्षा ४० टक्के आहे त्यामुळे राज्याच्या वित्तपुरवठ्यात पोकळी निर्माण होणार आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा  उभारी देण्यात राज्यांची योगदान महत्वाचे असणार आहे पण राज्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, तर केंद्र सरकार अर्थव्यस्थेला उभारी देण्यासाठी जी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्यात राज्ये योगदान देऊ शकणार नाहीत त्यामुळे राज्यांनी कर्ज घेण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्ज घेणे अधिक कार्यक्षम आणि रास्त होईल असे त्यांनी नमूद केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago