दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील वाखारी येथे नवरा बायकोच्या किरकोळ वादातून नवऱ्याने आपल्या पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याची खळबळजनक घटना वाखारी (भापकर वस्ती) ता.दौंड येथे शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी भांडणे सोडविण्यास आलेले दोन शेजारी आणि मृत महिलेच्या मुलालाही पोटात चाकु खुपसण्यात आल्याने मोरे दाम्पत्य दोघेजण पुण्यात तर मृत महिलेच्या मुलाला केडगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
फजलेहक अब्दुलहक शेख असे या 49 वर्षीय आरोपीचे नाव असून शालू गजानन राजन हिरे असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे. फजलेहक याने किरकोळ भांडणातून अगोदर त्याच्या पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून केला तर भांडणे सोडविण्यास आलेले केशव मोरे आणि विजया मोरे या दाम्पत्यावर त्याच चाकूने हल्ला करत नंतर स्वतःच्या 20 वर्षीय मुलावरही जीवघेणा हल्ला करून त्याने आपल्या माथेफिरू वृत्तीचे दर्शन घडविले. याबाबत या आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले असून जखमींवर खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास यवतचे सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहेत