Categories: Previos News

एकमेकांच्या साथीने आपल्याला लढायचंय, कोरोनाला हरवायचंय : आमदार राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दौंडकरांना आवाहन करत आपल्या सर्वांना कोरोनाशी लढून त्यास हरवायचे आहे असा संकल्प केला असून त्यांनी याबाबत आपले मनोगत व्यक्त केले आहे. 

आमदार कुल यांनी सहकारनामा’ला माहिती देताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझी कोरोना टेस्ट केली व ती पॉझिटीव्ह आली असल्याचे सांगत सुदैवाने माझ्या संपर्कात असलेल्या माझ्या कुटुंबीयांची, कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, माझी प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरु आहेत तेव्हा काळजी नसावी असा संदेश दिला आहे.

संचारबंदी दरम्यान स्थानिक प्रशासनाशी समन्वय, कोरोना संदर्भात विविध उपाययोजनांसाठी बैठका , नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करताना अनेकांशी संपर्क येत होता, जरी योग्य ती काळजी घेत असलो तरीहि कोरोना संक्रमणाचा धोका होताच परंतु दौंड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य पार पाडताना लोकांच्या समस्या सोडविताना हे क्रमप्राप्त होते. 

पुढील उपचारांसाठी मी विलगीकरणात जरी असलो तरी  माझे दैनंदिन काम नित्यनियमाने सुरु असेल, आपल्या अडी अडचणीसाठी माझ्या कार्यालयाचा हेल्पलाइन नंबर ७०३८६६७७९९ द्वारे मी आपल्या सेवेत सदैव उपलब्ध असेल.  आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत लवकरच मी आपल्या सेवेत पुन्हा दाखल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

5 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago