Categories: Previos News

कोरोना निगेटिव्हने कुंजीरवाडीत खुशी, तर पॉझिटिव्हने लोणीमध्ये बडा गम



थेऊर | सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी) 

पूर्व हवेलीतील लोणी काळभोर हे गाव प्रतिबंधीत क्षेत्रातून रद्द केल्यानंतर केवळ चोवीस तासातच पुन्हा दोन नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुन्हा या गावावर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित होण्याची टांगती तलवार आहे. 

पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, कदमवाकवस्ती परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले गेले त्यानंतर अठ्ठाविस दिवसात पुन्हा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने काल बुधवारी उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी ही गावे यातून रद्द केल्याचे पत्रक काढले होते. आज लोणीकाळभोर येथील लोणीस्टेशन परिसरात एक 62 वर्षीय नागरिकास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना ताबडतोब तपासणी साठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे लोणीकाळभोर प्राथमीक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ दगडू जाधव यांनी सांगितले. तसेच अन्य एक सत्तर वर्षीय जेष्ठ वैदूवाडी येथील कदमवाकवस्ती परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते त्यांची ही कोरोना चाचणी पाॅजिटीव आल्यावर या दोन नवीन कोरोना रुग्णांची  भर पडली आहे. तर कुंजीरवाडी येथील कोरोना रुग्ण आज निगेटीव्ह आल्याने आज घरी परतला त्यामुळे कुंजीरवाडीत खुशी तर लोणीमध्ये गम पसरल्याचे पहायला मिळत आहे. कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता संदीप धुमाळ यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना आपण आपली व सहकार्यांची काळजी घ्यावी आणि भविष्यात एकही नविन रुग्ण आढळणार नाही याची खबरदारी आपण सर्वजण घेऊ असे सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago