केडगाव, बोरीपार्धी नंतर वरवंड येथेही कोरोनाचा शिरकाव, एकजण पॉझिटिव्ह!



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी येथे कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आता केडगाव, बोरीला लागूनच असलेल्या वरवंड येथेही कोरोना रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती वरवंड येथील प्राथमिक  रुग्णालयाचे डॉ. तुकाराम बनसोडे यांनी दिली असून या रुग्णाची खाजगी लॅबमध्ये केलेली चाचणी पॉझिटिव्ह अली आहे. तर या रुग्णाची सरकारी लॅबमध्ये चाचणी करून मग अहवाल दिला जाईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.

वरवंड येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला रुग्ण हा पुण्यात कामाला असल्याची माहिती समोर येत असून त्या रुग्णाला कोरोनाची लागण नेमकी पुण्यात झाली की वरवंड येथे याबाबत माहिती समजू शकली नाही.

गेल्या चार दिवसांमध्ये केडगाव आणि बोरीपार्धी येथे तब्बल 13 कोरोना बाधित रुग्ण आढळले होते त्यामुळे याठिकाणी नागरिक घराबाहेरही निघत नसल्याचे दिसत आहे मात्र आता कोरोनाचा रुग्ण वरवंड येथेही सापडल्याने वरवंडकरांच्या चिंता वाढल्या आहेत.