Categories: Previos News

दरोडे टाकणाऱ्या गुंड अक्षय काळे टोळीतील फरार दरोडेखोर ‛केडगाव’मध्ये जेरबंद



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

शिरूर तालुक्यातील निमोने येथील दहा लाखांची लूट करणारे गुंड अक्षय काळे याच्या टोळीतील आठ दरोडेखोर यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत चपळाईने व शिताफीने पकडले होते. 

शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील अटक आरोपींचा साथीदार  शिवा उर्फ किशोर छबु साळुंके (राहणार – बोरीपार्धी, तालुका दौंड जिल्हा पुणे) हा त्याचे इतर साथीदारांना अटक केल्यापासून फरारी होता. सदर आरोपी पोलिसांना गुंगारा देत असले कारणाने त्याला पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके नेमण्यात आली होती. शिवा उर्फ किशोर साळुंके हा केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB आणि यवत पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी केडगाव परिसरामध्ये सापळा रचला होता. सदर आरोपी हा केडगाव रेल्वे स्टेशन परिसरात येताच तेथे त्याला पकडण्यात येऊन त्यास पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून शिरूर पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दत्तात्रय गुंड, सहा.फोै.दत्तात्रय गिरीमकर, पो हवा. उमाकांत, पो.हवा. जितेंद्र पानसरे, पो.ना.राजू मोमीन, पो.ना जनार्दन शेळके, पोना विजय कांचन, पो शि. धिरज जाधव यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

6 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago