तर मग ‛एड्स आणि स्वाईन फ्ल्यू’ कोणी पसरवला? चीनचा अमेरिकेवर पलटवार



वृत्तसेवा : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आता चीन आणि अमेरिकेमध्ये चांगलाच तणाव वाढताना दिसत आहे. अमेरिकेने थेट चीनवर केलेल्या आरोपांमुळे बेचैन झालेल्या चिननेही आता अमेरिकेला त्याच भाषेत उत्तर दिले असून आमच्यामुळे कोरोना पसरला म्हणता तर मग एड्स आणि स्वाईन फ्ल्यू पसरण्याला तुम्ही जबाबदार आहात का? असा सवाल चीनने अमेरिकेला विचारला आहे.

चीनला परिणाम भोगावे लागेल चीनने मुद्दाम कोरोना जगात पसरवल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेला आता चीनने प्रत्यूत्तर दिले आहे. 

एड्स आणि स्वाईन फ्ल्यू व्हायरसचे केंद्र अमेरिकेत होते आणि नंतर ते संपूर्ण जगात पसरले याची आठवन चीनने अमेरिकेला करून देत मग अमेरिकेला तेव्हा दंड का नाही केला गेला? आता कोरोना व्हायरसमुळे आमच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी का केली जात आहे असा सवालही विचारला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसची जागतिक महामारी पसरविण्यामागे चीन जबाबदर असल्याचे सांगत परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी याबाबत बोलताना २००९ मध्ये स्वाईन फ्ल्यूचा फैलाव झाला होता आणि जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये तो पसरून २ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता त्यावेळी कोणी अमेरिकेकडे नुकसानभरपाई मागितली नाही असे म्हणत एड्स व्हायरसही पहिल्यांदा अमेरिकेमध्ये शोधला गेला आणि हा रोग जगभर विखुरला मात्र त्यावेळी कोणी अमेरिकेला जबाबदार ठरवले का असा सवाल उपस्थित करत अमेरिकीचे आरोप खोडून काढले आहेत.