हडपसरमध्ये डॉक्टर आपल्या दारी उपक्रमातून शेकडो नागरिकांची तपासणी करून औषध वाटप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‛सविता अनिल मोरे’ यांचा पुढाकार



हडपसर : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना व्हायरस चा वाढता प्रभाव व नागरिकांनी दक्षता घ्यावी या हेतूने प्रभाग क्रमांक 22 मध्ये मोफत आरोग्य शिबीर घेतले, नागरिकांच्या सक्षम व निरोगी आरोग्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी पुढाकार घेत असतो परिसर कोरोना मुक्त व्हावा याकरिता शिबिरातून जनजागृती केली व औषध वाटप केले असल्याची माहिती हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा उपाध्यक्षा सविता मोरे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 22 मधील 15 नंबर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत सुरसे, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश सहसंघटक अनिल मोरे, सतीश जगताप, विशाल दिलीप तुपे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय जैन संघटना, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार मोहन दादा जोशी, यांचे मोलाचे सहकार्य या शिबीरासाठी लाभले. 

हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे, डॉ.लाला गायकवाड व वैदकीय पथकाने सहभागी नागरिकांची तपासणी केली व मोफत औषध वाटप केले.

शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा सविता अनिल मोरे, सागर चव्हाण, सचिन मोरे, अनिल चव्हाण, सचिन तांबे, प्रशांत गायकवाड, सुनील तांबे, सोमनाथ मोरे, अजीम सय्यद, कुमार शितोळे यांच्यासह युवकांनी केले होते.

सोशल डिस्टन्स चा वापर करीत नागरिकांना मास्क दिले, सॅनिटायझर दिले त्यानंतर तपासणी करून आवश्यकतेनुसार गोळ्या व औषध वाटप केले, तसेच यावेळी माळवाडी परिसरातील महिलांना धान्याचे किट वाटप केले.