दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
भारतरत्न,राष्ट्रसंत मदर तेरेसा यांची 110 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने दौंड शहरातील मदर तेरेसा चौकातील स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
संत मदर तेरेसा सामाजिक संस्थेच्या वतीने, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तसेच काँग्रेस पक्षाचे बाबा करीम शेख यांच्या हस्ते यावेळी मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. नागसेन धेंडे, राजू गजधने, भास्कर सोनवणे, ॲड. सिकंदर शेख, सुभाष शिंदे, रतन जाधव, विनय खरात, निलेश गायकवाड, धीरज सोनवणे,डॉमनिक पॅट्रिक, जोसेफ डॅनियल, कुमार पॉल, डेनिस पॉल,गणेश जाधव, बबलू नामुगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पो.निरीक्षक सुनील महाडिक व आर. पी.आय.चे पदाधिकारी भारत सरोदे यांनी संत मदर तेरेसा यांच्या महान कार्याची माहिती आपल्या मनोगतातून दिली. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत जयंती साजरी करण्यात आली. संत मदर तेरेसा सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मोजेस पॉल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.