अरे बापरे… चक्क कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच लावली गांजाची झाडे, सपोनि.हनुमंत गायकवाड यांनी केला गांजा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश



सातारा : सहकारनामा ऑनलाईन

खंडाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बहुउद्देशीय हॉलच्या भिंतीलगत आडोशाला बेकायदा विगर परवाना मानवी मनावर व मेंदूवर परिणाम करणारे अंमली पदार्थ (गांजाच्या) एकुण १० झाडाची लागवड करून ती जोपासणाऱ्या दोन आरोपीविरूध्द खंडाळा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा बहुउद्देशीय हॉल हा भाडेकराराने जयंत पॅकींग इंडस्ट्रिज प्रा.लि.वडाळा मुंबई या कंपनीला दिलेला आहे. त्या हॉलमध्ये लाकडाचे पैलेट बनविण्याचे कामकाज केले जाते. ते काम करणेकरीता कंपनीने पर प्रांतीय राज्यातील एकुण ०५ कामगार कामाकरीता ठेवलेले आहे. ते कामगार त्याच हॉलमध्ये काम करून तिथेच राहणेस आहेत. आज दिनांक ०६/०६/२०२० रोजी पहाटे ०४.०० वा. च्या सुमारास खंडाळा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पो.ना.प्रशांत धुमाळ हे शासकीय वाहनातून रात्रगस्त करीत असताना एक इसम हा बहूउद्देशीय हॉल लगत असलेल्या भिंतीजवळ पोलीस गाडी पाहून संशायस्पद रित्या अचानक लपवून

बसल्याचे दिसले. त्याचवेळी तात्काळ त्या ठिकाणी जावून खात्री करण्याकरीता त्या इसमास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव लल्लू श्रीराम (वय ३३ वर्ष रा.माझीलगाव जाजूपूर यस्ती राज्य उत्तरप्रदेश सध्या रा.बहुउद्देशीय हॉल खंडाळा) असे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार चंदन ओमनानूदास भारती (वय ३४ वर्ष रा.विशनपूर राणा पार ता.गोरखपूर राज्य उत्तर प्रदेश सध्या रा.खंडाळा) असे दोघांनी मिळून बहुउद्देशीय हॉलचे पुर्व भिंतीलगत गांजाच्या एकुण १० झाडांची अंदाजे सहा महिन्यापूर्वी लागवड केली आहे. ती झाडे मोठी झाली असल्याने ती दिसू नयेत म्हणून त्यावर मच्छरदानीचे पांढरे कापडाने झाकत असल्याचे सांगितले. त्याचे सांगणेप्रमाणे त्याने दाखविलेल्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता हॉलच्या भिंतीलगत आडोशाला २ ते ४ फुट उंचीची एकुण दहा गांजाची झाडे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्याबाबत सविस्तर माहिती घेवून खात्री केली असता ती गांजाचीच झाडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचे सांगणेवरून त्याचा मित्र चंदन ओमनानुदास भारती यास त्याच्या घरातून ताब्यात घेतले असता त्या दोघांनी गांजाच्या झाडांची विनापरवाना लागवड केलेली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईकामी ताब्यात घेवून त्यांचे विरूद खंडाळा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८, २० (अ) (ब) २२(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींकडून लागवड केलेली २ ते ४ फुट उंचीची एकुण १० झाडे (१ किलो ४३५ ग्रॅम) वजनाची त्याची किंमत रूपये ७.१७५/- असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई फलटण उप विभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा

पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, महिला पोलीस उप निरीक्षक स्वाती पवार तसेच पोलीस हवा. संजय धुमाळ, संजय थोरवे, शांताराम शेलार, पो.ना.सचिन वीर, तुषार कुंभार गिरीष भोईटे व पो.शि.बालाजी वडगावे विठ्ठल पधार, शरद यादव व महिला पोलीस शिपाई रेणूका सावंत यांचे पथकाने केली. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहेत.