कोविड सेन्टरमध्येच कोरोना रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे शहरात असणाऱ्या  कोंढवा येवलेवाडी येथे  महानगर पालिकेच्या कोविड सेन्टर मध्ये एका ६० वर्षीय वृद्ध कोरोना रुग्णाने केली असल्याची घटना घडली आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर हे वृद्ध त्यांच्या मुलासह उपचारासाठी या सेन्टरमध्ये भर्ती झाले होते. त्यांचा मुलगा जेवण आणण्यासाठी गेला असताना या वृद्धाने बाथरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांचा मुलगा आल्यानंतर त्याचे वडील बाथरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्याने कर्मचाऱ्यांना बोलवले त्या नंतरही काहीच प्रतिसाद येत नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी बाथरूमचे दार उघडल्यानंतर या रूग्णाने गळफास घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस पंचनामा करत असून चौकशी नंतर घटनेचा तपशील समोर येईल. महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलीस तापसानंतर अधिक तपशील समोर येईल असे सांगितले.