Categories: Previos News

पळा पळा.. कमांडो आले, मोकाट स्वारांना कमांडोंनी झोडपले



लोणी काळभोर : सहकार नामा ऑनलाईन

 भाग कमांडो आया, भाग कमांडो आया ने लोणी काळभोर गावात चर्चेचा विषय बनला आहे. विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांना कमांडोकडुन मजबूत चोप मिळाल्याने मोकाट स्वारांची पळता भुई थोडी झाली आहे. 

पुर्व हवेलीतील कदम वाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन ही बफर झोन (कोरोना प्रतिबंधित क्षेत्र) करण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आल्याने  परिसरात  पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्पेशल कमांडोची तुकडी लोणी काळभोर परिसरात दाखल करण्यात आली आहे. अतिदक्षतेसाठी लोणी काळभोर परिसर सील करण्यात आला होता. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यापार उद्योग बंद करुन संचारबंदी केली होती. परंतु काही महाभाग चार पाच जणांचे टोळ गोळा करुन पत्ते खेळणे, एकत्रित जमा होऊन गप्पा मारत बसणे, कारण नसताना गावात फिरणे, किरकोळ वस्तुच्या नावाखाली दुचाकी गाड्या घेऊन फिरणे असे उद्योग परिसरात वाढले होते. यागोष्टीचा स्थानिक पोलीस यंत्रणेवर येत होता. तर पोलीस गाडी आली की लपाछपीचा खेळ ह्या ठंग्याकडुन केला जात होता. मात्र दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या कमांडोकडुन लोणी काळभोर परिसरात विनाकारण फिरणार्यांना असा मजबूत चोप देण्यात आल्याने मोकाट स्वारांची चांगलीच पळता भुई थोडी झाली आहे. 

काल सकाळी काही मंडळी माॅर्गिंग वाॅक करत रामदरा रोडला फिरत असताना कमांडो फोर्सला दिसुन आली. पोलिसांना बघुन काही मंडळी पळाली मात्र एकाची चांगलीच हौस कमांडोनी पुर्ण केली. चालण्यासाठी आलो असल्याचे कारण सांगुन दिशाभूल करणाऱ्याची कमांडोने चालण्याची परेड घेऊन चांगलालीच जिरवली तर संध्याकाळच्या वेळेत गावात जमाव करुन गप्पा झोडणार्या टघ्यांना पळुन झोडपून काढल्याने विनाकारण फिरणार्यांना कमांडो फोर्सचा चांगलाच चाप बसला आहे. लोणी काळभोर परिसरात दोन तीन ठिकाणी कमांडो फोर्सने दंडा परेड केल्याने टघ्यांना कुठे तरी लगाम बसेल अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago