पाटस’मध्येही दोन डॉक्टरांना ‛कोरोना’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील पाटस येथे असणाऱ्या दोन डॉक्टरांना कोरोनाची

लागण झाल्याने पुन्हा एकदा दौंडकरांच्या चिंता वाढल्या आहेत. या बाबतची माहिती वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी  बनसोडे व पाटस चे

आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी दिली आहे.

कोरोनाने सध्या कोरोना योद्ध्यांनाच टार्गेट केले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कालच केडगाव येथील एका प्रसिद्ध डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली होती तर त्याच्या अगोदरही एका डॉक्टरांसहित त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पाटस येथील डॉक्टर हे नेमके कोणाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह झाले याबाबत परिसरात चर्चा सुरू असून ते केडगाव येथील डॉक्टरांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता पाटस परिसरात वर्तवली जात आहे.