राहू बेट परिसरात ‛दुसरा’ कोरोना रुग्ण सापडला, पुण्यात रेंटवर असलेल्या घराचे घरमालक, मालकीण पॉझिटिव्ह असल्याची समोर आली कोरोना हिस्ट्री



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात असणाऱ्या पानवली येथे एक कोरोना रुग्ण आढळून आला असून या अगोदर दहिटने येथे एक वयस्क व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती.

 राहू बेट परिसरात असणाऱ्या गावांपैकी एक असणाऱ्या पानवली येथे हि कोरोना बाधित महिला रुग्ण सापडली असून ती पुण्यात ज्या भाड्याच्या घरात राहत होती त्या घराच्या मालक, मालकिणीला कोरोनाची लागण झाल्याची हिस्ट्री समोर आली असून याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी सहकारनामा’शी बोलताना दिली आहे.

या कोरोना बाधित रुग्ण तरुणीचे वय अवघे 25 वर्ष असून ती पुणे येथे कामास होती मात्र ती ज्या घरात भाड्याने राहत होती त्या घराच्या मालक आणि मालकिणीला कोरोनाची बाधा झाली होती असे समोर येत आहे. ती काही दिवसांपूर्वी आपल्या दौंड तालुक्यातील पानवली या गावी आली  असताना तिला फक्त सर्दी झाल्याचे जाणवले त्यानंतर तिच्यावर राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ उपचार करून तिची खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती देण्यात आली.