Categories: Previos News

दौंड तालुक्यातील सुमारे १० हजार बांधकाम कामगारांना मिळणार २ हजार रुपयांचा थेट लाभ : आमदार राहुल कुल यांची माहिती

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे  देशासह राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. सदर लॉकडाऊन कालवधीत इमारत व इतर बांधकाम बंद झालेले आहेत. राज्यातील इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सध्या कोणतेही कामकाज करता येत नाही. त्यामुळे या सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बांधकामाच्या ठिकाणी अथवा त्यांच्या घरी थांबावे लागत आहे. त्यांना दररोजची रोजंदारी मिळत नाही. यामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- इतके अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (DBT) जमा करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. या योजनेत दौंड तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांची नोंदणी आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यातून मागील दोन वर्षांच्या काळात करण्यात आली होती. यापूर्वी या कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा लाभ झाला असून या वैश्विक महामारीच्या काळात हाताला काम नसणाऱ्या कामगारांना यामाध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago