जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मान्सूनपूर्व आढावा बैठक, बैठकीत दिल्या या महत्त्वाच्या सूचना



पुणे | सहकारनामा ऑनलाईन

जून महिना आणि त्यामध्ये सुरू होणारा पावसाळा याला आता काही दिवस बाकी राहिलेले आहेत. त्यामुळे आता पावसाळ्यात येणाऱ्या अडी अडचणी लक्षात घेता याबाबत उपाय योजना करण्यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा  बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पावसाळ्यात कोरोना विषाणूसह इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या यावेळी त्यांनी मान्सून पूर्व तयारी करण्यासाठी ओढे, नद्यांमधील गाळ काढणे, कृषी विषयक सर्व औषधे, खते बी-बियाणे यांची दुकाने सुरू ठेवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने धोकादायक पूल, जुन्या इमारती, वाड्यांच्या बांधकामांची तपासणी करणे तसेच रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या साईड पट्ट्या भरुन घेणे, रस्त्यांच्या बंद झालेल्या मोऱ्या दुरुस्त करणे, कृषी विभागाने अवकाळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करणे अश्या सूचना केल्या.

याच बरोबर दरड व पूर ग्रस्त गावांची यादी तयार करून योग्य ती कार्यवाही करावी. शॉर्ट सर्किट व लूज कनेक्शन ठिकाणी महावितरण विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी असेही सूचित केले.