Categories: Previos News

श्री फिरंगाईमाता उच्च माध्यमिक विद्यालयात मुलींचे घवघवीत यश, विद्यालयाचा निकाल ९७.५६ टक्के



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

कुरकुंभ(ता.दौंड) येथील श्री फिरंगाईमाता  विद्यालयाचा निकाल ९७.५६ टक्के लागला आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल गुरुवार (दि.१६) रोजी ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाला आहे.

श्री फिरंगाईमाता उच्च माध्यमिक विद्यालयात २०५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते,त्यापैकी २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेचा आणि वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ९० टक्के एवढा लागला आहे.

विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु.भागवत रिंकू विजय(८८.४६ टक्के),द्वितीय क्रमांक कु.शिर्के किरण सत्यवान(८६.३०) तृतीय क्रमांक जाधव गौरी सदाशिव(८६.०० टक्के) तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु.देशमुख जान्हवी सुहास(८३.८४ टक्के) द्वितीय क्र. जाधव सानिका राजेंद्र(८३.०७) संयुक्त तृतीय क्र. घागरे भाग्यश्री कुंडलिक(७९.८४ टक्के),कु.मचाले ज्योती प्रल्हाद(७९.८४ टक्के) तर कला शाखेतून प्रथम क्र. आटोळे पूजा राजेंद्र(७८.१५ टक्के) द्वितीय क्र. गावडे प्रतीक्षा कल्याण( ७५.२३ टक्के) तर तृतीय क्र.पवार शेखर दत्तात्रय(७४.१५ टक्के) यांनी मिळविला.

या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उत्कर्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य श्री. केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष श्री.अनिल शितोळे, सचिव श्री.सचिन शितोळे, कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांसह संस्थेचे संचालक मंडळ, विद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,ग्रामस्थ यांच्याकडून विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे अभिनंदन केल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब भापकर यांनी दिली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

24 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago