Categories: Previos News

प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा.., प्रांताधिकारीसचिन बारवकर यांचा इशारा



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन

पूर्व हवेलीत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने हवेलीचे प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांनी आज लोणी काळभोर येथे महत्वपूर्ण बैठक घेऊन आरोग्य महसूल व पोलिस प्रशासनाला नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये लग्न समारंभात केवळ पंन्नास व्यक्तीना परवानगी दिली आहे, यापेक्षा जास्त व्यक्ती आढळून आले तर कडक कारवाई केली जाईल तसेच जो व्यक्ती मास्क वापरणार नाही, सार्वजनीक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या.

गेल्या आठवड्यापासून पूर्व हवेलीत कोरोनाचा कहर वाढला आहे. लोणी काळभोर कदमवाकस्ती शेवाळेवाडी कुंजीरवाडी थेऊर उरुळी कांचन यासारख्या मोठ्या लोकसंख्येत दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी यावर अटकाव घालण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. परंतु ग्रामस्थ यासाठी प्रशासनाला मदत करत नसतील नियमाचे पालक करत नसतील तर ग्रामपंचायत पोलिस व महसूल यांनी हरकतीत येऊन दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

ही बैठक लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली यावेळी तहसीलदार सुनील कोळी,  हवेलीचे उपसभापती युगंधर काळभोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे आरोग्य अधिकारी डाॅ सचिन खरात,  थेऊरच्या मंडलाधिकारी गौरी तेलंग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, सरपंच आश्विनी गायकवाड, उपसरपंच राजाराम काळभोर, लोणी काळभोर प्राथमीक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ दगडू जाधव आदी उपस्थित होते

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago