नागरिकांना रेशनधान्याबाबत कुठलीही अडचण असल्यास संपर्क करावा : आ.राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील सर्वच रेशनिंग दुकानांमधून धान्य वाटप सुरू केले असून याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास माझ्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार अॅड. राहुल कुल यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना आमदार अॅड. कुल म्हणाले की, तालुक्यात अंत्योदय कार्डची संख्या 6927 असून त्यावरील लाभार्थी संख्या 31111 आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या कार्ड ची संख्या 44887 असुन त्यावरील लाभार्थी संख्या  210316  आहे. या दोन्ही ही कार्डधारकांना एप्रील महिन्यासाठीचा धान्यसाठा आला असून त्याची वाटपास ही सुरुवात झाली आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत वाटपासाठी मंजूर असलेला तांदूळ ही रास्तभाव दुकानदारांकडे पोहोच झाला आहे. त्यानुसार त्याचेही वाटप सध्या रास्तभाव दुकानदारांकडून सुरू करण्यात आले आहे. हे रेशनिंगवरील धान्य मिळत असताना किंवा मिळण्यासाठी कोणतीही अडचण नागरिकांना येवू नये म्हणून मी स्वतः प्रशासनाची दोन वेळा बैठक  घेतली असून सर्व रास्त दुकानदारांना हे धान्य वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण येवू देवू नका अश्या सूचना  फोनवरून केल्या असून, महसूल यंत्रणेला सूचना करून  हे धान्य व्यवस्थित वितरित होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यातून ही कोणतीही अडचण निर्माण झाल्यास माझ्या (7038667799) या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करावा असे आव्हानही आमदार अॅड. कुल यांनी केले आहे.