दौंड तालुक्यातील नागरिकांची कोविड तपासणी तालुक्यातच होणार : आमदार राहुल कुल यांची माहिती



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख) – दौंड तालुक्यात सुरवातीचे ५१ दिवस कोणताही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.
मात्र सध्या तालुक्यात
दहिटणे येथे १ व राज्य
राखीव पोलीस बल गट क्र ७ येथे ८
रुग्ण कोरोना बाधीत आहेत. या पार्श्वभूमीवर
आमदार कुल यांनी
स्थानिक विकास निधीतून शासनमान्य कोरोना चाचणीचे
किट खरेदी केले असुन ते
दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले आहेत. या किट
च्या माध्यमातून आज सात नागरिकांचे तपासणीचे नमुने घेतले असुन ते आज पुणे येथे
पाठविले आहेत.
तसेच तालुक्यातील कोरोना बाबत उपाययोजना म्हणून कोविडसेंटर व डेडिकेटेड कोविडसेंटरची निर्मिती
करण्यात आली आहे. 
दहिटणे येथील बाधित रुग्ण
व राज्य राखीव पोलीस दलातील बाधित जवान यांना स्थानिक संसर्ग झाला असून ते बाहेरून
बाधित होऊन तालुक्यात आलेले आहेत.
 राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या
बाबतीत ही
वैद्यकीय अस्थापना सतत लक्ष ठेवून असुन ते आपल्या सर्वांच्या
रक्षणासाठीच काम करत असल्याने त्यांना
कोणतीही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील
राहणार आहे. कोरोना चे संकट मोठे असले तरी सर्वांनी गट तट विसरून या संकटाचा सामना
करू असे आव्हान ही कुल यांनी केले आहे