Categories: Previos News

मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीच्या रुग्णालयांची उभारणी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुण्याच्या शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आज कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीद्वारे करणे तसंच पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी दिले. 

यावेळी बोलताना त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसंच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आलंय. त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबवण्याची गरज आहे. कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरांचे नियोजन या सर्व उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीनं नियोजन केल्यास नियोजनात आणखी सुसुत्रता येईल असं सूचित केलं. 

कंटेनमेंट झोन निहाय उपाययोजनांची पाहणी तसंच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण क्षेत्र मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहिजेत असं स्पष्ट केलं.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago