Categories: Previos News

भीमा नदीवरील बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली : आ.राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील देऊळगाव राजे, कर्जत तालुक्यातील औटेवाडी, श्रीगोंदा तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी भीमा नदीवर बुडीत बंधारे बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठीची निविदा सूचना आज जाहीर करण्यात आली आहे. याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश आले असून याबाबत त्यांनी माहिती देताना नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दि. १३ मार्च २०२० रोजी तारांकित प्रश्न आपण उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले कि, बुडीत बंधारे बांधणेबाबत समिती स्थापन करण्यात आली असून दौंड तालुक्यातील आवश्यक त्याठिकाणी बंधारे बंधानेबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यांनी दिले होते. त्यानंतर या समितीच्या शिफारसीनुसार बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे कुल यांनी सांगितले. दौंड तालुक्यातील देऊळगावराजे, पेडगाव, वाटलुज, हिंगणीबेर्डी, नायगाव, राजेगाव व खानोटा या भागातील शेतकऱ्यांची शेतीची सिंचन योजना व पाणी पुरवठा योजना उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून आहेत. उजनी जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांना व पिण्याच्यापाणी पुरवठा योजनांनाची लांबी वाढून पाणी घ्यावे लागते तसेच हे पाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी शेतीला व पिण्याला पाणी उपलब्ध नसते अशी परिस्थिती तालुक्यातील या भागात होत असल्याचे आमदार राहुल कुल यांनी वारंवार होणाऱ्या बैठकांमध्ये नमूद केले होते. तसेच आमदार कुल यांनी बुडीत बंधारे करण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरत विधानसभेत यापूर्वी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला असून, त्यानुसार बैठक होऊन भीमा नदीत बुडीत बंधारे करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला होता.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago