बारामतीमध्ये पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला, खबरदारीचे उपाय सुरु



 बारामती : सहकारनामा ऑनलाईन

– बारामतीमध्ये आज दिनांक ६ एप्रिल रोजी पुन्हा एका रुग्णास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर रुग्णाच्या बाधित परिसरातील भागामध्ये औषध फवारणी करून त्या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या लोकांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तसेच तालुका आरोग्यधिकारी काळे यांनी दिली आहे. सदर रुग्ण हा समर्थनगर बारामती शहरातील  असून त्यांच्या कुटुंबाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे त्यामुळे अनेक लोकांशी त्यांचा येणारा संपर्क लक्षात घेता सर्व परिसरामध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी आणि आरोग्यधिकारी यांनी बारामतीतील नागरिकांनी बाहेर फिरू नये घरात राहावे याबाबत सूचना केल्या आहेत. सद्य परिस्थिती लक्षात घेता बारामतीमधील समर्थ नगर हे केंद्र (Center) धरुन ३ किमी परिसरात Containment झोन म्हणुन व तेच केंद्र धरुन ५ किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करणेत येत आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करणेत येत आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले आहे. हे आलेले संकट लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये.  झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करणेत आली आहे. तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येतील. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत  survey करणेत आहे. सर्वांना विनंती प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बारामतीचे प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर यांनी केले आहे.