पुणे : सहकारनामा
मुळशी तालुक्यातील पिरंगुटच्या घोटावडे फाटा येथे सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुकानामध्ये त्यामुळे जीवित हानी झाली नाही.
मारुंजी येथील अग्निशमन दलास काही वेळातच आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने आग विझविण्यासाठी बंब पाठवण्यात आले. आग लागण्याची घटना किराणा दुकानामधून सुरू होऊन ती शेजारील हार्डवेअर दुकानापर्यंत पोहोचली होती परंतु ‘पीएमआरडीए’अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचत ही आग विझविण्याचे मोठे प्रयत्न सुरू केले आणि शेवटी आगीवर नियंत्रण मिळवण्यात या जवानांना यश आले. चार वाजता लागलेल्या आगीवर साडे पाच वाजता पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. लागलेली मोठी आग विझविण्यासाठी उपअग्निशमन अधिकारी विजय महाजन, राहुल शिरोळे, वैभव कोरडे, प्रशांत अडसूळ, सुरज इंगवले, निखिल फरांदे, संदीप तांबे हे तातडीने घटनास्थळी पोचल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने बाजूला असणाऱ्या दुकानांचे मोठे नुकसान होता होता वाचले.