‛त्या’ कोरोना बाधीत तरुणाच्या नातेवाईकांचा अहवाल निगेटीव्ह



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी) 

कुंजीरवाडी येथे सापडलेल्या कोरोना बाधीत तरुणाच्या घरातील सर्व नातेवाईकाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली त्यामुळे आरोग्य खात्यासह सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना होम काॅरंटाईन करण्यात आले आहे. 

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिक्षेत्रात एकही कोरोना रुग्ण नव्हता परंतु परवा अचानक एक पस्तीस वर्षीय तरुणाचा अपघात झाला त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या असता कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. त्याच्या नातेवाईकांना तपासणी साठी पाठवण्यात आले आज त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कुंजीरवाडी गावच्या सरपंच सुनिता धुमाळ यांनी कोरोना संसर्गाशी दोन हात करण्यासाठी मोठी तयारी केली होती संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले तसेच बाजरपेठाचे नियोजन केले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने केवळ दोन दिवसच उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.विशेष म्हणजे सर्व नागरिकांचे संपूर्ण सहकार्य यास लाभले तरीही खबरदारीचे उपाय चालू आहेत.