कुंजीरवाडीत कोरोना रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

 कोरोना पासून दूर असलेल्या कुंजीरवाडी गावात आज अचानक एक रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली असून त्या व्यक्तीच्या घरातील सर्व कुटुंबीयांना तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडीचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती एका पार्टीसाठी बाहेर गेला होता त्यावेळी त्याचा अपघात झाला त्यात त्याला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर शस्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण चाचण्या केल्या गेल्या. त्यात कोरोना चाचणीही करण्यात आली तेंव्हा ती पाॅजिटीव आल्याने एकच खळबळ उडाली कारण त्या खाजगी रुग्णालयातील त्याला उपचार देणारा सर्व स्टाफ व अपघातानंतर त्याला दवाखान्यापर्यंत मदत करणारे व्यक्ती यांनाही या कोरोना चाचणीसाठी विलगीकरण करण्यात आले आहे.यानंतर सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या असून संपूर्ण गाव कंटेटमेंट करण्यात आले आहे तर पुढील चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार असून थेऊरफाटा येथील सर्व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचे व कुंजीरवाडी गावातील केवळ दुध डेअरी सकाळी दोन तास चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सरपंच सुनिता धुमाळ यांनी सांगितले. ही व्यक्ती कुंजीरवाडी गावच्या परिसरात राहण्यास होती त्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे