Categories: Previos News

..तर तालुक्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येका सोबत हे करावे लागेल : आमदार राहुल कुल यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील दहिटणे येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी त्वरित दौंड तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत पुढील उपाय योजनांनाबाबत नियोजन करत सूचना  दिल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे दौंड तालुक्यात प्रत्येक  जाणारा-येणारा नागरिक तपासणी करूनच  गेला पाहिजे अशी महत्वाची सूचना आमदार  कुल यांनी प्रशासकिय यंत्रणेस केली आहे. याबाबत आमदार कुल यांनी बोलताना सध्या तालुक्यात जो कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती प्रशासनाने घेतली असून त्यांच्या टेस्ट घेण्यात येणार आहेत. तसेच दहिटणे गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणारा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याचे सांगत दौंड व यवत पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी चेकपोस्ट अधिक कडक कराव्यात अश्या सूचना देऊन त्यांना महसूल व ग्रामविकास विभागाने मदत करावी जेणेकरून कोणताही नागरिक जा – ये करत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येईल याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.  जर रुग्ण संख्या वाढली तर त्यावर कशाप्रकारे उपाय योजना करण्यात येईल याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला असून नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग वाईज नागरिकांना लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी घरपोच कशा दिल्या जातील याची व्यवस्था करता येते का?  यासंदर्भात मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे यांना प्रत्येक गावात  आठवड्यातून दोन वेळा भाजीपाला बाजार भरता येतो का काय याबाबत संबंधित ग्रामपंचायत सरपंचांशी चर्चा करण्याबाबत सांगितले असून मी स्वतः या सगळ्यांशी फोनद्वारे संपर्कात राहून चर्चा करणार असल्याचेही कुल यांनी सांगितले. या आढावा बैठकीस तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे , उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ संग्राम डांगे , ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया आदी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago