Categories: Previos News

आठवडे बाजार सुरू होणार! अनेक सरपंच मात्र निर्णयावर ‛नाखूष’



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना व्हायरसने आपला रुद्रावतार धारण करताच लॉकडाऊनसह सर्वच व्यवहार, बाजार ठप्प झाले होते मात्र आता 

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित प्रतिबंधित क्षेत्र वगळता मागील दोन ते अडीच महिन्यांपासून बंद असलेले जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार सुरु करण्यात यावेत असे आदेश पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरी अनेक तालुक्यांतील सरपंचांनी मात्र यावर आपली प्रतिक्रिया देत नाखुशी जाहीर केली आहे. दौंड तालुक्यातील केडगाव ही एक मुख्य बाजार पेठ असून येथील सरपंच अजित शेलार-पाटील यांनी याबाबत आपले मत व्यक्त करताना बाजार सुरू करण्याबाबत नाखुशी जाहीर करत केडगावची परिस्थिती पाहता येथील आठवडे बाजार सुरू करणे धोकादायक ठरू शकते असे म्हणत केडगावच्या बाजारासाठी बाहेर गावावरूनही अनेक नागरिक, व्यापारी, शेतकरी येत असतात त्यामुळे या बाजारासाठी जागा कमी पडत चालली आहे. पुणेशहरातून अनेक व्यापारी या बाजाराला येत असतात. त्यांच्यावर सध्या नियंत्रण ठेवणेही अवघड आहे. त्यामुळे मोकळीक मिळून गर्दी होत राहिल्यास  कोरोना येथे ही आपले पाय रोवू शकतो अशी भीती व्यक्त करत नागरिकांना गरजेच्या वस्तू, अन्न, धान्य मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरू करणे ग्रामस्थांसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणचे अपवाद वगळता अनेक ग्रामपंचायतीच्या संरपंचानीही या निर्णयावर नाखुशी जाहीर करत नाक मुरडले आहे. आठवडे बाजारामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता बाजार सुरु झाल्यानंतर कोरोना व्हायरस ग्रामीण भागामधेही कोरोनाचा शिरकाव होऊन याची मोठी किंमत मोजावी लागू शकते अशी भीती सरपंचांकडून व्यक्त केली जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

9 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago