महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवस्थान उडवून देण्याची दाऊदकडून धमकी! दुबईवरून फोन आल्याने निवस्थानाची सुरक्षा वाढवली



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे असणारे मातोश्री हे निवासस्थान उडवून देऊ अशी धमकी दाऊदच्या हस्तकांकडून  देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून एका मराठी वृत्तवाहिनीनेहि याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बॉम्बस्फोटांचा आरोपी आणि कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या पंटरने हा धमकीचा फोन केला असल्याची माहिती पुढे येत आहे. या सर्व प्रकरणा नंतर मुख्यमंत्र्यांचे असलेले मातोश्री निवासस्थान हे सुरक्षेच्या कारणावरून सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मातोश्रीवर तब्बल 3 ते 4 वेळा हे धमकीचे फोन आले असल्याने या ठिकाणी आता अधिकची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मातोश्री हे मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान असून ते उडवून टाकू अशी धमकी दिली गेली असून हि धमकी दुबईवरुन मातोश्रीवर फोन करून देण्यात आली आहे. 

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पंटरने केले असल्याचे समजते असून  त्यामुळे खबरदारीचा उपाय केले जात आहेत.