Categories: Previos News

सोरतापवाडीच्या तलाठ्यास वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

सोरतापवाडी ता. हवेली येथील गावकामगार तलाठी यांना 20 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार सोरतापवाडी येथील गावकामगार तलाठी रामकृष्ण कारंडे यांनी  एका शेतकऱ्याच्या हक्कसोड व वाटप नोंद करण्यासाठी 40 हजार रुपायांच्या लाचेची मागणी केली होती. यावर त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला होता. त्यानुसार उपायुक्त तथा पोलिस अधिक्षक  राजेश बनसोडे अप्पर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करुन ही कारवाई केली. आज सोरतापवाडी येथे तडजोड रक्कम रु.20 हजाराची लाच स्विकारताना कारंडे यांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणी लोकसेवक लाचेची मागणी करत असेल तर विभागाशी संपर्क साधावा.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago