: सहकारनामा
अमेरिकेच्या CDDEP (सेंटर फॉर डिसीज डायनामिक्स, इकॉनॉमी अँड पॉलिसी) या संस्थेने भारतातील लोकांना धोक्याचा इशारा दिला असून त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार लोकांनी एकमेकांना भेटणं थांबवल नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊन सुमारे ४०कोटी लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात एकवीस दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे मात्र कोरोनाला पूर्णपणे रोखण्यासाठी नुसता लॉकडाऊन हा एकमेव प्रतिबंधक उपाय होऊ शकत नसून जनतेनेही त्यास गंभीरपणे घेऊन जर एकमेकांना भेटणे बंद केले नाही तर ही महामारी पुढे भयानक रूप धारण करेल असा दावा CDDEP ने आपल्या अहवालात केला आहे.
पुढे अधिक माहिती देताना त्यांनी जर अशीच परिस्थिती सुरू राहिली तर जुलै ते ऑगस्ट महिण्यापर्यंत भारतातील ३० ते ४० कोटीच्या आसपास जनतेला या कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते असा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस जगात धुमाकूळ घालत असताना या अंतरतरराष्ट्रीय संस्थेने भारताविषयी धक्कादायक खुलासा केल्याने चिंतेमध्ये वाढ झाली आहे. CDDEP चे संचालक डॉ. रामनन लक्ष्मीनारायण यांनी झी वृत्तवाहिनीला माहिती देताना कोरोना विषाणूने नुकतेच भारतात पाय ठेवले आहे. लॉकडाउनने कोरोनापासून बचाव होण्यासाठी नक्कीच मदत होते मात्र हा पूर्णपणे उपाय होऊ शकत नाही असे सांगत सध्या देशातील १०लाख पैकी केवळ १५ जणांची कोरोना टेस्ट घेण्यात येत आहे. देशातील अनेकांना संसर्ग होण्याचा धोका संभवत आहे. सर्व नागरिकांना स्क्रीनिंगची सुविधा दिल्यानंतरच कोरोना विषाणूची नेमकी संख्या किती आहे हेही कळेल असे त्यांनी सांगत आम्ही असे म्हणू शकतो की केवळ तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये या महामारीला ब्रेक लावून हे थांबविले जाऊ शकते. पण भारताच्या संदर्भात तिसरा आणि चौथा टप्पा अद्याप आलेलाच नाही.भारतात आतापर्यंत कोरोनाची ७२७ प्रकरणांची नोंद झाली आहे. यातील सुमारे १६ लोकांचा मृत्यू झाला असून ४४ लोकं बरे झाले आहेत असे त्यानी सांगितले