कोरोनाच्या पाश्वभूमीवर बँक आपल्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्स ठेवणे आवश्यक असल्याने थेऊर येथील बॅक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने बॅक आपल्या दारी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये बँकेतून पैसे काढणे व बँकेत पैसे टाकणे या दोन्ही सुविधा पुरविण्यात आल्या आहेत अशी माहिती बँक ऑफ इंडिया थेऊर शाखेचे व्यवस्थापक अंकुश पाटील यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असताना बँकेतील कर्मचाऱ्यांनाही याचा धोका आहे कारण ग्राहक बँकेत दररोज पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी येत असतो. अलिकडे ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक खातेदारांच्या खात्यात शासनाकडून पैसे वर्ग झाल्याने अडचणीच्यावेळी पैसे काढण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहे. यावर उपाय म्हणून बँक आपल्या दारी ही अभिनव कल्पना थेऊर शाखेने अमलात आणली यासाठी ग्राहकमित्र चंद्रकांत निंबाळकर व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची मदत घेतली जात आहे. या शाखे अंतर्गत येणारी कोलवडी थेऊर कुंजीरवाडी नायगाव या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी ग्राहकांचा आधार कार्ड  नंबर मात्र आवश्यक आहे.