Categories: Previos News

सलमानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज : ‛राधे’ची शूटिंग पुन्हा सुरू होणार! या ऐतिहासिक स्टुडिओत होणार शूटिंग

मुंबई : कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे गेली अनेक महिने लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मोठं मोठ्या सिनेमांचे शुटींगही बंद आहे. बॉलिवूड ही याला अपवाद नसून आता मात्र सलमानच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज समोर येत आहे. मिळत असलेल्या  माहितीनुसार सलमान खान ने राधे या मुव्हीची शुटींग पूर्ण करण्यासाठी महबूब स्टुडिओमधील एक फ्लोर बुक केला असून येत्या ऑगस्टमध्ये राधे’ची शुटींग सुरू होऊ शकते असा अंदाज आहे.

राधे सिनेमातील निवडक गाणी आणि राहिलेल्या सीन्सची शुटींग आता ऑगस्टमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सिनेमात दिशा पाटनी आणि सलमान खान एकत्र दिसणार आहेत. यातील गाणी विविध लोकेशनला शूट करण्यात येणार होती मात्र आता यातील एक गाणे स्टुडिओतच शुट केलं जाणार असून ईद चा मुहूर्त लॉकडाऊनमुळे फेल झाल्याने हा सिनेमा आता दिवाळीच्या मुहूर्तावर  रिलीज केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. याबाबत या चित्रपटाचे डायरेक्टर प्रभू देवा आणि प्रोड्युसर अतुल अग्निहोत्री यांनी कोरोनामुळे कुठलीही रिस्क नको म्हणून कास्ट आणि क्रू मेंबर्सच्या सेफ्टीबाबत कमालीची जागरूकता ठेवली. हा सिनेमासाठी मेहबूब स्टुडिओचे फ्लोर बुक करण्यात आल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago