Categories: Previos News

‘राजे लखुजीराव जाधवराव कला गौरव’ पुरस्काराने रोहन रासकर सन्मानित



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दि. 19 फेब्रुवारी 2020 शिवजयंती रोजी रोहन वसंत रासकर (राज्य सचिव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग) यांना शिवजयंती महोत्सव समिती पुणे, राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट (राजमाता जिजाऊंचे वडील) राजे जाधवराव व राजे जाधव घराण्याने कला व सांस्कृतिक विभागातील उल्लेखनिय कामगिरी बद्दल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ देवाराजे जाधव यांच्या हस्ते ‘राजे लखुजीराव जाधवराव कला गौरव’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट चे हे पाचवे वर्ष होते. स्वराज्यरथ याच बरोबर ट्रस्ट चा सामाजिक कार्यामध्ये मोलाचा वाटा आहे. यंदा ट्रस्ट ने किल्ले स्पर्धा आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये  उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना गौरवण्यात आले. यावेळी ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब राजे जाधव यांनी बोलताना सांगीतले कि राजे लखुजीराव जाधव यांच्या नावाने पुण्यामध्ये स्मारक तयार करुन गरिब होतकरू मुलांसाठी अभ्यासीका व व्यायामशाळा चालु करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. महाराष्ट्र भर अशाच प्रकारे ट्रस्ट काम करेल असे त्यांनी सांगीतले. पुरस्कार्थी रोहन वसंत रासकर मनोगत व्यक्त करताना बोलले कि हा सन्मान ऑस्कर पेक्षाही माझ्यासाठी बहुमूल्य आहे कारण शिवजयंतीच्या दिवशी राजमाता जिजाउंच्या घराण्याने हा माझा सन्मान केला हे मी माझे भाग्य समजतो. यावेळी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, माजी उपमहापौर निलेश मगर, आजी माजी नगरसेवक, तुषार राजे जाधव, विक्रमसिंह जाधव, दिग्वीजय जाधवराव, समिर जाधवराव, निलेश राजे जाधव व संपूर्ण राजेजाधव व जाधवराव परिवार उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

5 मि. ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

13 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

15 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

17 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago