Categories: Previos News

अप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव यास तात्पुरता जामीन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

संपूर्ण पुणे ग्रामिणमध्ये दरारा निर्माण करणारा अप्पा लोंढे याचा कट रचून खून केल्याचा ठपका असलेला आरोपी विष्णू जाधव यास तात्पुरता जामीन देण्यात आला आहे. हा जामीन त्याच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रियेसाठी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अप्पा लोंढे खून  प्रकरणात विष्णू जाधव यावर मोक्का कायद्याअंतर्गत मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलेले आहे.

या खून आणि खुनाचा कट या प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधव याला मोक्का न्यायालयात वैद्यकीय कारणान्वये त्याचे वकील विजयसिंह ठोंबरे व संदीप बाली यांचे मार्फत जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या वतीने वकिलांनी त्याची बाजू मांडताना आरोपीस हृदयरोग शुगरचा असल्याचे न्यायालयात युक्तिवाद करत आरोपीच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावयाचे असल्याचे सांगून जर हे ऑपरेशन होऊन औषधोपचार झाले नाही तर  त्यास कायमचे अंधत्व येऊ शकते अशी बाजू न्यायालयात मांडण्यात आली. तसेच आरोपीस वैद्यकीय उपचार मिळणे हा त्याचा नैसर्गिक अधिकार असून त्यास तात्पुरता जामीन देण्याची विनंती न्यायालयात केली यावेळी न्यायालयास तात्पुरता जामीन देण्याचे अधिकार असल्याचे नमूद करत वैद्यकीय उपचार घेण्यासाठी मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आरोपीस जेलमधून सुटका झाल्यापासून १ महिन्याकरिता तात्पुरता जामीन मंजूर केला असून पन्नास हजार रक्कम रुपयांच्या जात मुचलक्यावर व १ महिन्याचे अवधी नंतर सरेंडर होण्याचे व लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत न जाण्याचे अटीवर सदरचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

21 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago