Categories: Previos News

आता भाजीपाला थेट आपल्या दारी, व्यापाऱ्यांची अनोखी शक्कल

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले हे आता नवीन सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. या लॉकडाउनच्या काळामध्ये किराणा आणि भाजी पाला विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे कडक निर्णयही काही ठिकाणी घेण्यात आले आहेत. असाच निर्णय दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेकांना दररोज लागणारा भाजी-पाला आणि किराणा सारख्या जीवनावश्यक वस्तूही आता मिळणे बंद झाले आहेत मात्र यावर काही व्यापाऱ्यांनी अनोखा उपाय शोधला असून ते ज्या सोसायटीमध्ये राहत असतील तेथेच पार्किंग मध्ये त्यांनी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता नागरिकांना लॉक डाउनमुळे बाहेर पडता येत नसले तरी आपल्या सोसायटीच्या पार्किंगमध्येच सर्व वस्तू मिळू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर व्यापाऱ्यांनाही कुठेही बाहेर न जाता बऱ्यापैकी सोसायटीमध्येच ग्राहक मिळत असल्याने त्यांचाही ताण कमी होताना दिसत आहे. असाच पॅटर्न सर्वत्र राबविल्यास लोकांची गरज नसताना  वाढलेली वर्दळ कमी होण्यास मदत होईल असे मानले जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago