दौंड : (Crime) बेटवाडी येथे सव्वा लाखाचा देशी दारू साठा जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत बेटवाडी ता.दौंड जि.पुणे येथे बेकायदेशीर बिगरपरवाना साठा केलेला देशी दारूचा सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी मा.पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, रौफ इनामदार, अक्षय जावळे यांचे पथक दिनांक दिनांक ११ जुलै २०२० रोजी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत दौंड-पाटस रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना पथकास दौंड बेटवाडी येथे एका घरामध्ये बेकायदेशीर विक्रीसाठी देशीविदेशी दारूचा साठा असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने दौंड बेटवाडी येथे अचानक छापा टाकून इसम नामे संदिप भाऊसो भुजबळ वय ३३ वर्षे रा.बेटवाडी ता.दौंड जि.पुणे यास ताब्यात घेवून त्याचे घरामध्ये बेकायदा, बिगरपरवाना विक्रीसाठी ठेवलेले देशी दारूचे ५० बॉक्स त्यामध्ये १८० मि.ली. च्या २,४०० बाटल्या कि.रु. १,२४,८००/- (एक लाख चोवीस हजार) असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून आरोपी विरूध्द मुंबई दारूबंदी कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील अधिक तपास दौंड पोलीस स्टेशन करीत आहे. पुणे जिल्हयात लॉक डाऊन होण्याची शक्यता असल्याने सदर दारुचा विक्रीसाठी साठा केल्याची माहिती समजली आहे.