कोरोनाबाबत आता नागरिकही झाले जागृत, ‛केडगाव’च्या सोसायटीमध्ये बसवले सॅनिटायझर टनेल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन


दौंड तालुक्यातील केडगावमध्ये कोरोनाबाबत आता नागरिकही जागृत झाल्याचे समोर येत आहे. केडगाव येथे असणाऱ्या वृंदावन सिटी या सोसायटीच्या मुख्य गेटवर सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे.





याबाबत येथी रहिवासी आनंद बोरा यांनी माहिती देताना सोसायटीतील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीकरीता बाहेर पडतात तेव्हा त्या लोकांनी या सॅनिटायझर रूम मध्ये कमीत-कमी २० सेंकद थांबून हात वर करून गोल फिरण्यास सांगितले जाते आणि त्यानंतर त्यांना पुढील कामासाठी जाऊ दिले जाते असे सांगीतले.


सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातीलच हा एक चांगला उपाय असून बाहेर फिरून आल्यानंतर कपडे आणि अंगावर आलेले विषाणू या फवारणीमुळे नष्ट केले जातात त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यांमध्येही असे टनेल बसविण्यात आले असून आता नागरी वस्तीमध्येही हे टनेल लोकांनी स्वयंस्फूर्तीने बसविल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.