: सहकारनामा ऑनलाईन
कोरोनाचे संक्रमण कधीही, कुठेही आणि कुणालाही होऊ शकते. मात्र आपल्या देशात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोनाची बाधा झाल्याची बहुधा ही पहिली वेळ असेल.
आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली असून या याबाबत खुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. शिवाय त्यांच्या सोबत काम करणारे आणि संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी टेस्ट करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणावर आपले बस्तान भारतामध्ये बसवले आहे. नागरिकांमध्ये या व्हायरसबद्दल चीड आणि भीती दोन्ही पाहायला मिळत आहे. जवळपास 4 महिने देशात लॉकडाउन स्थिती असल्याने सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. सर्वच व्यवहार ठप्प असल्याने आता पुढे कसे होणार असा विचार नागरिक करत आहेत, त्यातच दिग्गज सेलिब्रिटी आणि आता मुख्यमंत्र्यांनाही कोरोना होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत होत चालले आहेत.