दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
जिल्हा आणि तालुक्यातील मंदिरे आणि धर्मस्थळांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावेत या मागणीसाठी दौंड तालुका भाजपच्या वतीने आज तालुक्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.
मंदिरे सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध धार्मिक संस्था संघटना धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी आज बोरमलनाथ मंदिर चौफुला येथे दौंड भाजप चे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा भाजप महिलाध्यक्षा कांचन कुल, भाजप तालुकाध्यक्ष माउलीअण्णा ताकवणे, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेवनाना बारवकर, भीमा पाटस चे मा.संचालक मल्हारराव गडधे, पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस तानाजीराव दिवेकर, गणेश आखाडे, ज्ञानेश्वर शेळके, सोमनाथ गडधे यांच्यासह शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.