‛कोरोना’ गया तेल लेने, उससे क्या डरना.. केडगावच्या ‛त्या’ कोरोना पॉझिटिव्ह निडर डॉक्टरचा, नागरिकांना सकारात्मक संदेश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव येथे एका ‛निडर’ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आणि केडगावमध्ये खळबळ माजली. गेल्या 30 वर्षांपासून या डॉक्टरांना ‛निडर’ अशी पदवी केडगाव येथील नागरिक आणि त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांनीच दिली आहे. कारण, कसलीही इमर्जन्सी केस असो की कोणत्याही स्टेपवर पोहोचलेला पेशंट असो हे डॉक्टर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करणारच आणि मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढणारच असे त्यांचे हे ठरलेले गणित सर्वश्रुत आहे. 

मात्र हे सर्व सुरळीत सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आणि या डॉक्टरांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानंतर ते  उपचारासाठी पुण्यात भरती झाले. मात्र कोरोना होऊनही हार मानून गप्प बसतील या कॅटेगिरीतील हे डॉक्टर नाहीत हेही सर्वांना माहीत होते. ते पुण्यात खाजगी दवाखान्यात भरती झाले मात्र तेथे टेंशन न घेता त्यांनी दररोज प्रत्येकाला फोन करून लोकांच्याच तब्येतीची विचारपूस सुरू केली. सध्याही ते लोकांना धीर देत आहेत आणि तुम्ही घाबरू नका, फक्त योग्य काळजी घ्या, मग हा कोरोना तुमचे काही वाकडे करू शकणार नाही असा पॉझिटिव्ह विचारसारणीचा सल्लाही देत ते मजेत असल्याचे आवर्जून सांगत आहेत. याबाबत ज्यावेळी त्यांचा आमच्याशी फोनवरून संपर्क झाला त्यावेळी त्यांनी ‛साला ‛कोरोना’ गया तेल लेने, उससे क्या डरना.. मस्त जिनेका, टेंशन नही लेनेका, मै कुछ दिन मे निगेटिव्ह होकर आ रहा हू, फ़िक्र मत करो सिर्फ खुदका अच्छा खयाल रखो असा आम्हालाच सकारात्मतेचा मंत्र दिला. या निडर डॉक्टरांची सकारात्मकता  पाहून नक्की कोरोना त्यांना झालाय की आपल्याला असाच प्रश्न अणेकांना पडल्याशिवाय राहत नाही.