आरोग्य : असे करा आपले वाढलेले वजन कमी



आरोग्य : 

उपाशी राहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे किंवा वाट्टेल तर खाणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक समजल्या जातात. वजन कमी करण्यासाठी शरीराला इजा न होता वजन कमी करणे यालाच खऱ्या अर्थाने आरोग्यम धनसंपदा म्हणता येईल. तर आज याच बाबी लक्षात घेऊन आपण नैसर्गिकरित्या वजन कसे कमी करता येईल हे पाहणार आहोत. सध्याच्या धकाधकीच्या काळात लोकांनी झटपट खाणे आणि कामावर जाणे अशी जीवनशैली अंगिकारली आहे त्यामुळे याचा परिणाम आपल्या शरीरावर हळू हळू व्हायला लागतो. भरपेट खा, वाट्टेल ते खा असा काहीसा फंडा आपल्याकडे वापरला जातो. त्यामुळे गरज नसतानाही आणि भूक नसतानाही केवळ टेस्ट म्हणून जे पदार्थ शरीरात  ढकलले जातात त्याचा इफेक्ट खूपच भयानक होत असतो हे अगोदर सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे.

वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम हवाच मात्र त्यामध्ये चालणे, योगासन याचा समावेश असावा. पुढील काही महत्त्वाच्या टिप्स अवश्य आपणांस वजन घटविण्यासाठी फायद्याच्या ठरतील..

● कोमट पाणी : सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरते, यामुळे याने कॅलरीज कमी होतात. शिवाय या  गरम पाण्यात  आपण जर लिंबू किंवा मध टाकून ते पाणी प्यायलो तर याचा खूपच चांगला इफेक्ट नक्कीच जाणवेल.

(टीप – मधू मेह असणाऱ्यांनी मध टाळावे)

● पहाटेचे चालणे : पहाटे  पहाटे निसर्गरम्य वातावरणात पायी चालणे खूपच फायद्याचे ठरते, या वेळी असणारी हवा ही खूपच शुद्ध असते. त्यामुळे या हवेत योगासने, हलके जॉगिंग करणे या गोष्टी पोटातील चरबी करण्यासाठी मदत करतात.

● नौकासन: योग हि एक अशी देणगी लाभलेली आहे यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्हीच्या व्याधी दूर होण्यास मदत मिळते. यामध्ये ज्याचे वजन वाढल्याने पोट सुटले आहे त्याचे पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.

● जेवणाच्या वेळा : जेवण हे योग्य वेळी आणि संतुलित गरजेचे आहे. अनेकजण स्वतःला काही वाईट सवयी लावून घेतात त्यातीलच एक म्हणजे एक चुकीची प्रथा म्हणजे रात्री उशिरा जेवणे, हे रात्रीचे जेवण आपल्या पोटातील चरबी वाढवण्याच काम करतं हे अनेकांना माहीत असूनही त्या चुका केल्या जातात. रात्रीच्या जेवणाची वेळ हि रात्रीच्या झोपण्याच्या दोन तास आधी असावी म्हणजे झोपण्याच्या दोन तास अगोदर जेवण करावे आणि जेवल्यानंतर त्वरित झोपी जाऊ नये. झोपण्या अगोदर थोडे चालून यावे त्यास आपल्याकडे शतपावली असेही म्हणतात. या काही टिप्सचा अवलंब केल्यास आपले वजन कमी होण्यास आणि आरोग्य सुधारण्यास नक्किच मदत होते.