पुणे : सहकारनामा ऑनलाईन
– ‛कोरोना व्हायरस’ नामक महामारीचे संकट संपूर्ण जगावर घोंघावत आहे. या संकटावर मात करण्यासाठी देश विदेशातील डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. पुणे, मुंबईमधील डॉक्टरही सध्या या कामामध्ये स्वतःला झोकून देत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करून त्यांची काळजी घेत आहेत. सध्यातरी या कामामध्ये सर्वात जास्त योगदान हे डॉक्टरांचे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज ‛कोरोना’ला हरवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पुणे येथील नायडू आणि मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वतःची काळजी घेण्याचे व कोणत्याही मदतीची गरज असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.